रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक

By Admin | Updated: March 21, 2015 01:24 IST2015-03-21T01:24:30+5:302015-03-21T01:24:30+5:30

अनारक्षित रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक प्रिंट करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने १८ मार्च रोजी दिल्ली येथे केली.

Helpline number on railway tickets | रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक

रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक

अकोला : रेल्वे प्रवाशांना जागरूक करणे आणि व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून आरक्षित तथा अनारक्षित रेल्वे तिकिटांवरच हेल्पलाइन क्रमांक प्रिंट करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने १८ मार्च रोजी दिल्ली येथे केली. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, सुरक्षा, आपत्कालीन चिकित्सा, स्वच्छता, जेवण, कोचमधील अव्यवस्था आदींबाबत माहिती आणि तक्रार नोंदविण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात आलेले हेल्पलाइन क्रमांक रेल्वे तिकिटांवर दिसणार आहेत. आॅल इंडिया पॅसेंजर हेल्पलाइन क्रमांक १३८, गाड्यांच्या आवागमनाबाबत सूचना देणारा हेल्पलाइन क्रमांक १३९, प्रवाशांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला १८२ हा क्रमांक रेल्वे तिकिटांवर अंकित राहणार आहे. प्रवासादरम्यान आपले मूळ ओळखपत्र सोबत बाळगण्याच्या सूचनादेखील दिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Helpline number on railway tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.