शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी, भटक्या विमुक्तांवर मदतीचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 6:21 AM

वसंतराव नाईक महामंडळास ३०० कोटी रु.चे अनुदान : ओबीसी महामंडळास २५० कोटी

मुंबई : लोकसभा निवडणुकीला साडेतीन महिने शिल्लक असताना राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मंगळवारी इतर मागासवर्ग आणि भटक्या विमुक्त जातीजमातींवर आर्थिक मदतीचा वर्षाव केला. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळास ३०० कोटींचे तर राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) विकास महामंडळास अडीचशे कोटींचे सहायक अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने हे निर्णय घेताना ओबीसी व भटक्या जातीजमातींच्या व्होट बँकेला सुखावण्याचा प्रयत्न केला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना या दोन्ही योजना राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक महामंडळामार्फत राबविण्यात येणार आहे. ओबीसी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेची मर्यादा २५ हजारांहून एक लाख रुपये करण्यात आली. नियमित हप्ता भरणाºयास बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, तर थकित हप्त्यासाठी चार टक्के व्याज आकारले जाईल. एकूण ७३६ कोटींची मदत सरकारने जाहीर केली. मंत्रिमंडळ निर्णयाची माहिती ओबीसी विभागाचे मंत्री राम शिंदे यांनी दिली.

ओबीसी महामंडळांतर्गत १० लाखापर्यंतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी ५० कोटी आणि १० लाख ते ५० लाखापर्यंतच्या गट कर्ज परतावा योजनेसाठी ५० कोटी असे एकूण १०० कोटींची पहिली योजना, शामराव पेजे आर्थिक विकास या उपकंपनीमार्फत राबविण्यासाठी ५० कोटी आणि ओबीसीमधील बारा-बलूतेदार समाजाच्या परंपरागत व्यवसायाची उत्पादकता वाढविण्यासाठी त्यांना आधुनिक साहित्य व वस्तू वाटपासाठी १०० कोटी रुपयांची विशेष योजना अशा तीन योजना राबविण्यात येतील.वडार, रामोशींना सहाय्य वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून १० लाखापर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी ५० कोटी आणि १० लाख ते ५० लाखपर्यंतच्या गट कर्ज परतावा योजनेसाठी ५० कोटी असे एकूण १०० कोटींची पहिली योजना, वडार व पारधी समाजासाठी विशेष योजना आणि रामोशी समाजासह इतर अतिमागास समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी विशेष योजना अशा तीन योजनांचा समावेश आहे.ओबीसी विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनााज्यातील प्राथमिक शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये पाचवी ते दहावीतील ओबीसी मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींना दरमहा ६० प्रमाणे दहा महिन्यांसाठी ६०० रुपये व ८ वी ते दहावीच्या विद्यार्थिनींना दरमहा १०० प्रमाणे दहा महिन्यांसाठी १ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. पालकांच्या उत्पन्नाची अट नसेल.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती