आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सेनेकडून मदत

By Admin | Updated: November 29, 2015 02:36 IST2015-11-29T02:36:08+5:302015-11-29T02:36:08+5:30

शिवसेनेच्या पाच आमदारांच्या पथकाकडून लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करुन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना प्र्रत्येकी १० हजारांची मदत देण्यात आली़

Help from suicidal families | आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सेनेकडून मदत

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सेनेकडून मदत

लातूर : शिवसेनेच्या पाच आमदारांच्या पथकाकडून लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करुन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना प्र्रत्येकी १० हजारांची मदत देण्यात आली़
आ़ उदय सामंत, आ़ विजय औटी, आ़ बालाजी किनीकर, आ़ गौतम चाबूकस्वार, आ़ सदानंद चव्हाण यांच्यासह जिल्हाप्रमुख संतोष सूर्यवंशी आदी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश आहे़ रत्नागिरीचे आ़ सामंत यांच्या पथकाने औसा व निलंगा तालुक्यातील हासेगाव वाडी, सारोळा, बोरफळ, नागरसोगा, फत्तेपूर, किनीनवरे, कार्ला, कुमठा, सांगवी, जेवरी या गावांसह इतर गावांची पाहणी करुन तेथील २५ कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजारांची मदत केली. शिरुर अनंतपाळ व देवणी तालुक्यात आ़ किनीकर यांच्या पथकाने ३ कुटुंबीय, तर आ़ औटी यांच्या पथकाने अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील १२ कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजारांची मदत केली. आ़ चव्हाण यांच्या पथकाने उदगीर व जळकोट तर आ़ चाबुकस्वार यांच्या पथकाने लातूर व रेणापूर तालुक्यात पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Help from suicidal families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.