गिरणी कामगारांनी केली मदत

By Admin | Updated: May 26, 2016 01:25 IST2016-05-26T01:25:04+5:302016-05-26T01:25:04+5:30

दुष्काळग्रस्तांना चौहोबाजूकडून मदत केली जात असतानाच आता संबंधितांना मदत करता यावी म्हणून गिरणी कामगारही सरसावले आहेत. गिरणी कामगार वारसा उत्कर्ष संघटनेच्या

Help by the mill workers | गिरणी कामगारांनी केली मदत

गिरणी कामगारांनी केली मदत

मुंबई : दुष्काळग्रस्तांना चौहोबाजूकडून मदत केली जात असतानाच आता संबंधितांना मदत करता यावी म्हणून गिरणी कामगारही सरसावले आहेत. गिरणी कामगार वारसा उत्कर्ष संघटनेच्या वतीने राज्यभरातील गिरणी कामगारांकडून मदत गोळा करण्यात आली आहे. या मदतीद्वारे संघटनेकडे जमा झालेले एक लाख रुपये दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी संघटनेने एक लाख एकशे एक रुपयांचा धनादेश सुपुर्द केला आहे, अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष भगवान शिंदे यांनी दिली. या वेळी सरचिटणीस आनंद मोरे, खजिनदार दीपक कदम, विश्वस्त सुरेश यादव, हिंदुराव
जाधव, शंकर सामल्ला, चंद्रकांत खाडे, मुरलीधर मुळे, तुकाराम
भोईर, विजय गावडे, कमल काटकर, दिलीप कुडाळकर उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Help by the mill workers