दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

By Admin | Updated: June 10, 2016 02:25 IST2016-06-10T02:25:10+5:302016-06-10T02:25:10+5:30

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने सामाजिक बांधिलकी जपत, नुकताच राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

Help hand in drought | दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात


मुंबई : बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाने सामाजिक बांधिलकी जपत, नुकताच राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. या वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १ लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी सुपुर्द करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे कामगार दिनी सत्यनारायण पूजा पार पडली. या पूजेचा खर्च मर्यादित ठेवून, वृत्तपत्र विक्रेत्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारला आहे.
गेली अनेक वर्षे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय-हक्कांसाठी झटत आहे. वृत्तपत्र विक्रेते भल्या पहाटे उठून निस्पृहपणे प्रत्येक दिवशी जवळपास ५० लाखांहून अधिक वर्तमानपत्रे पोहोचविण्याचे काम अवितरतपणे करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Help hand in drought