हेलिकॉप्टर उड्डाणाचे मानदंड ठरविणार
By Admin | Updated: June 14, 2017 00:50 IST2017-06-14T00:50:02+5:302017-06-14T00:50:02+5:30
गेल्या काही काळात हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातांच्या कारणांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. त्यातील आभ्यासावरुन उड्डाणांबाबत कठोर मानदंड

हेलिकॉप्टर उड्डाणाचे मानदंड ठरविणार
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही काळात हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातांच्या कारणांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. त्यातील आभ्यासावरुन उड्डाणांबाबत कठोर मानदंड घालून देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सिन्हा म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातावेळी तर जमिनीवरील धुरळा उडू नये, यासाठी साधे पाणी मारण्याची देखील खबरदारी घेतली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातासह इतर अपघातांच्या कारणांची सखोल तपासणी सुरू आहे. वैद्यकीय आणि धार्मिक पर्यटनासाठी हेलिकॉप्टरने प्रवास केला जातो. त्यासाठी अगदी दुर्गम भागातही जावे लागते.