एलिफंटा बेटांसाठी हेलिकॉप्टर सेवा

By Admin | Updated: February 15, 2015 00:53 IST2015-02-15T00:53:22+5:302015-02-15T00:53:22+5:30

जागतिक हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा बेटावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरने सेवा पुरविण्याची तयारी गिरीसन एअरवेजने सुरू केली आहे.

Helicopter service for Elephanta Islands | एलिफंटा बेटांसाठी हेलिकॉप्टर सेवा

एलिफंटा बेटांसाठी हेलिकॉप्टर सेवा

मधुकर ठाकूर - उरण
जागतिक हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या एलिफंटा बेटावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी हेलिकॉप्टरने सेवा पुरविण्याची तयारी गिरीसन एअरवेजने सुरू केली आहे. बेटावर पर्यटकांना घेऊन लँडिंग करण्यासाठी आणि सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित कंपनीने राज्य सरकारकडे केली आहे. उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी ही माहिती दिली.
एलिफंटा बेटावरील काळ्या पाषाणातील कोरलेली अद्भुत लेणी पाहण्यासाठी दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया येथून बेटावर पर्यटकांसाठी खासगी प्रवासी लाँच सेवा उपलब्ध आहे. तिथे पोहोचल्यापासून परतण्यापर्यंत
चार-पाच तासांचा वेळ मिळतो.
हा वेळ पर्यटकांना एलिफंटा बेट फिरण्यासाठी अपुरा ठरतो. या प्रवासी लाँच सेवेवर बंदर विभागाचे नियंत्रण आहे. मात्र पर्यटकांकडून परतीच्या प्रवासासह भरमसाट तिकीट दर आकारूनही त्यांना चांगली सेवा दिली जात नाही. त्यामुळे पर्यटक नेहमीच नाराजी व्यक्त करतात. त्याचबरोबर पर्यटकांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचीही वानवा असते. खासगी कंपनीच्या लाँच मालकांच्या मनमानी कारभाराला पर्यटक नेहमीच बळी पडतात. त्यांना कमी वेळेत बेटावर पोहचता यावे आणि एलिफंटा बेटावरील लेणी पाहण्यासाठी
अधिक वेळ मिळावा यासाठी गिरीसन एअरवेजने कंपनीने मुंबई ते एलिफंटा या मार्गावर हेलिकॉप्टर सेवा पुरविण्याची तयारी सुरू केली
आहे. (वार्ताहर)

च्सहा ते बारा आसन क्षमतेची हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅडची आवश्यकता आहे. त्यासाठी किनाऱ्यावर १२ एकर जागा राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे.

च्जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत उरण तहसीलदारांकडे विचारणा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत काम सुरू असल्याची माहिती उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी दिली. जागा उपलब्ध झाल्यास एलिफंटा बेटावर पर्यटकांसाठी लवकरच हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Helicopter service for Elephanta Islands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.