नक्षलग्रस्त भागात हेलिकॉप्टरची मदत!
By Admin | Updated: October 15, 2014 03:21 IST2014-10-15T03:21:17+5:302014-10-15T03:21:17+5:30
नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी या विधानसभा मतदार संघात १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे

नक्षलग्रस्त भागात हेलिकॉप्टरची मदत!
गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी या विधानसभा मतदार संघात १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ७३६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार असून, पैकी २०९ मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत. संवेदनशील भागातील मतदान केंद्राची श्वान पथकाद्वारे तपासणी करून तसेच पोलिंग पार्ट्या जाण्यापूर्वी मार्गाचीही रोड ओपनिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिली़
अहेरी मतदार संघात दुर्गम गावातील मतदान केंद्रापर्यंत पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याचे काम हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाचे सी-६० पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, बीएसएफचे जवान तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)