ओला कॅबसह फरार झालेल्या त्रिकूटाला बेड्या
By Admin | Updated: May 27, 2017 22:58 IST2017-05-27T22:58:59+5:302017-05-27T22:58:59+5:30
ओला कॅबमध्ये प्रवासी बनून चालकाला मारहाण करून कॅबसह फरार झालेल्या त्रिकूटाला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत वसंत पटेल (३३), सतीश सर्जेराव गायकवाड

ओला कॅबसह फरार झालेल्या त्रिकूटाला बेड्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओला कॅबमध्ये प्रवासी बनून चालकाला मारहाण करून कॅबसह फरार झालेल्या त्रिकूटाला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत वसंत पटेल (३३), सतीश सर्जेराव गायकवाड (२९), दामोदर बाजीराव गायकवाड (३१) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
रामलखन पटेल (२२) ओला कंपनीसाठी काम करतात. गुरुवारी रात्री तीन तरुणांनी त्यांची कॅब बूक केली. त्यानंतर पटेल यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोकड, मोबाइल हिसकावून त्यांचीच कार घेऊन पळ काढला. तक्रार दाखल होताच नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शनिवारी तपासाअंती त्रिकूटाला अटक केली.