बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी

By Admin | Updated: July 31, 2016 04:40 IST2016-07-31T04:40:17+5:302016-07-31T04:40:17+5:30

भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही बहुमताच्या जोरावर विधानसभेत कामकाज रेटून नेले जात आहे.

At the height of majority, the opponents smile | बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी

बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी


नाशिक : भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही बहुमताच्या जोरावर विधानसभेत कामकाज रेटून नेले जात आहे. सरकारला जनतेशी काहीही घेणे-देणे राहिलेले नाही. जनतेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या विरोधी पक्षांची मुस्कटदाबी लोकसभेबरोबरच विधानसभेतही भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना बाजार समितीच्या नियमन मुक्तीचा निर्णय घेतल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत आवाज उठवूनही त्यावर सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. कांदा लिलाव न झाल्याने कांदा उत्पादकांना सरकारने तत्काळ नुकसानभरपाई दिली पाहिजे. तसेच तत्काळ कांदा लिलाव सुरू केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. सर्वसामान्यांना महाग असलेली तूरडाळ मात्र महागड्या मॉलमध्ये स्वस्त करण्याकडे सरकारचा कल आहे. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये कधीच कांदा प्रश्न काय किंवा अन्य सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कधीही चर्चा नसते, असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)
>भाजपाने वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुढे आणला आहे. परंतु विधानसभेत असा प्रस्ताव आला तर शिवसेना, मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांबरोबरच राहतील असेही चव्हाण म्हणाले.मातोश्रीवर जाऊन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही भावांनी एकत्र आले तर ते ठाकरे कुटुंबाच्या दृष्टीने चांगलेच आहे. मात्र त्यांच्या भेटीबाबत अद्याप काहीही कळालेले नाही. मात्र त्यातून काही राजकीय घडामोडी आताच होतील, असे वाटत नाही, असे सांगत ठाकरे बंधूंच्या भेटीवर अशोक चव्हाण यांनी सावध पवित्रा घेतला.सब का मालिक एक म्हणून आम्हाला साईबाबांचा सहारा होता. साईबाबा शिर्डी संस्थानच्या नवीन निवडीतून विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना वगळल्याबाबत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Web Title: At the height of majority, the opponents smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.