शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:18 IST

दरम्यान त्यांनी प्रदेशात बांगलादेशी नागरिक  असल्याचे दावे फेटाळून लावत, जर असे कोणी आढळल्यास ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात महापालिका निवडणुकेचे वातावरण जबरदस्त तापले आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता, एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आरएसएसच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. "संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांना, ब्रिटिश राजवटीला विरोध केला म्हणून नव्हे, तर खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, म्हणून कारावास झाला होता," असे ओवेसी यांनी म्हटले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलत होते. दरम्यान त्यांनी प्रदेशात बांगलादेशी नागरिक  असल्याचे दावे फेटाळून लावत, जर असे कोणी आढळल्यास ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले.

भाजपवर टीका करता ओवैसी म्हणाले, "अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करत भाजप हिंदुत्वाचा अजेंडा राबवत आहे आणि प्रशासनातील अपयशावरून लक्ष विचलित करत आहे. एवढेच नाही तर, ‘इंग्रजांविरुद्ध लढताना संघाचा कुण्या नेत्याला तुरुंगवास झाला?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, "ते म्हणतात,हेडगेवार यांना कारावास झाला होता. मात्र त्यांना खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल कारावास झाला होता.  आणि आज ते मुस्लिमांप्रति द्वेष पसरवत आहेत," असा दावाही त्यांनी केला. 

ओवेसी पुढे म्हणाले, युसूफ मेहरअली यांनी ‘भारत छोडो’ आणि ‘सायमन गो बॅक’सारख्या घोषणा दिल्या, ते इतिहास वाचत नाहीत आणि आमच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप करतात."

बांगलादेश सीमेवरील कुंपणासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि सीमेवर नियंत्रण असूनही 10 किलोमीटरचे कुंपण पूर्ण झालेले नाही. चीन आणि आयएसआय बांगलादेशपर्यंत पोहोचले आहेत आणि इकडे भाजप-आरएसएस बांगलादेश बांगलादेश ओरडत आहेत. दरम्यान आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Owaisi questions RSS role in freedom fight, cites Hedgewar's imprisonment.

Web Summary : Owaisi questioned RSS's role in India's freedom struggle, claiming Hedgewar's imprisonment was for supporting the Khilafat movement, not opposing British rule. He refuted claims of Bangladeshi citizens in the state, calling it the central government's failure, and accused BJP of using Hindutva for political gain.
टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ