शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दुरुस्तीसाठी वरसावे पुलावर अवजड वाहनांना १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 21:03 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गा वरील वरसावे खाडीवरच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना १३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री नंतर  ते १५ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५५ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे .  

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मुंबई अहमदाबाद महामार्गा वरील वरसावे खाडीवरच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना १३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री नंतर  ते १५ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५५ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे .  

वरसावे येथील जुन्या पुलाचा वापर हा वसई - गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी केला जातो . परंतु सदर पूल हा खूपच जुना व जीर्ण झाला असून सुरक्षीततेच्या दृष्टीने आता तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्याने त्यासाठी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान जुन्या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याची अधिसूचना मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांनी जरी केली होती . परंतु ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्तांनी पत्र पाठवून दिवाळीत मुंबई - नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची असलेली वाहतूक आणि डायव्हर्शन रस्त्याच्या डागडुजूची कामे बाकी असल्याने दिवाळी नंतर बंदीचा निर्णय घेण्यास कळवले होते . त्या अनुषंगाने ती अधिसूचना रद्द केली होती . 

आता उपायुक्त काळे यांनी वरसावे पुलाच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने नव्याने अधिसूचना जारी केली आहे . त्या नुसार १३ ते १५ च्या मध्यरात्री पर्यंत असे तीन दिवस जुन्या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे . 

जुन्या पुलावरून दोन पैकी एकाच मार्गिकेवरून लहान वाहनांची वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे . त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे . बॅरेकेटिंग लावून सलग तीन दिवस पुलाची एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी असणार असल्याने ठाणे येथून पालघर, गुजरात कडे जाणारी जड अवजड वाहने ही वरसावे पुलावरून न जाता अन्य  पर्यायी मार्गावरुन केली जाणार आहे. 

ठाणे शहरातून वर्सोवा मार्गे पालघर सुरत बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहने ही मुंब्रा - खारेगाव टोलनाका – मानकोली – भिवंडी- वाडा – मनोर – पालघर – मार्गे जातील. दुसऱ्या पर्याय हा मुंब्रा – खारेगाव टोलनाका – मानकोली – भिंवडी – नदी नाका – अंबाडी – वज्रेश्वरी – गणेशपूरी – शिरसाट फाटा मार्गे जातील. तर मुंब्रा – खारेगाव टोलनाका – मानकोली – अंजूर फाटा – कामण-चिंचोटी – वसई विरार महानगरपालिका हद्दी मार्गे जातील. 

यातून महसूल विभागाची वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ह्या बंदीतून सवलत देण्यात आली आहे . या दिवसात वरसावे पूल आणि परिसरातील महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता या मार्गावरून अनावश्यक कारणा शिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे . पर्यटक आणि बाहेरगावी जाणाऱ्यांनी देखील याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर