मुंबई- गोवा महामार्गावर गुरुवारी (०५ जून २०२५) आणि शुक्रवारी (०६ जून २०२५) अवजड वाहनांना घालण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी याबाबत आदेश जारी केले आहेत. शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्यासंख्येत रायगडावर येतात. त्यामुळे मुंबई- गोवा माहामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, येत्या ५ जून २०२५ सायंकाळी ४.०० वाजल्यापासून ते ६ जून रात्री १०.०० वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा, नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगाव - निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावर सर्व प्रकारच्या जड - अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे.