शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

यंदा भरपूर पाऊस: पिक परिस्थिती साधारण;  भेंडवड घटमांडणीचे भाकीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2022 10:38 AM

Prediction of Bhendwad formation : घटमांडणी चे भाकितानुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले असून, जून महिन्यात साधारण पाऊस येईल.

- जयदेव वानखडे

जळगाव जामोद:  तीनशे वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवड घटमांडणी ची भविष्यवाणी आज दिनांक 4 मे रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली.

        गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील पारावर केलेली घटमांडणी आणि अक्षय तृतीयेला झालेली घट मांडणी या दोन्ही मांडणीचे साधर्म्य तपासून आजच्या घटमांडणी चे भाकीत जाहीर करण्यात आले. भेंडवड घटमांडणी चे भाकितानुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले असून, जून महिन्यात साधारण पाऊस येईल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही. जुलै महिन्यात कमी पाऊस पडेल. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जून-जुलै पेक्षा जास्त पाऊस पडेल. आणि सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त पाऊस सांगितला आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली आहे.

आणि पीक परिस्थिती साधारण चांगली राहील. अवकाळी पाऊस सुद्धा पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 

   देशाचा राजा कायम असून,राज्याच्या अडचणीत वाढ होणार आहे आर्थिक परिस्थिती खालावलेली राहील, शत्रूपासून त्रास संभवतो परंतु भारताचे संरक्षण व्यवस्था त्याचा मजबुत सामना करेल. देशाच्या तिजोरीत आहे तर अनेक ठिकाणी चारा टंचाई सुद्धा असेल पावसाळा भरपूर असल्याने जलाशय भरलेली राहतील, टंचाई जाणवणार नाही. तसेच पृथ्वीवर अनेक नैसर्गिक संकटे येतील. त्यामुळे जनतेला सांभाळून रहावे लागणार आहे. यावर्षी रोगराई मात्र कमी असेल.  धनधान्याच्या भावात चढ-उतार राहतील, असे भाकीत आज पार पडलेल्या भेंडवड घटमांडणीने वर्तविले आहे हे घटमांडणी ऐकण्यासाठी आज पंचक्रोशीतून हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. आजच्या गट भांडणामुळे शेतकर्‍यांमध्ये चांगल्या पिक पाण्याबाबत आनंदी वातावरण होते तर पृथ्वीवर येणाऱ्या नैसर्गिक संकटांना बाबत चिंतेचे वातावरण दिसून आले..

टॅग्स :buldhanaबुलडाणाweatherहवामान