शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, रेल्वेसेवा विस्कळीत

By admin | Updated: July 30, 2016 08:09 IST

मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचले असून रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले असून रात्रभर पडलेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचले आहे. काल दिवसभर पावसाचा जोर कायम असतानाच रात्रीही उपनगरांत पावसाने दमदार हजेरी लावली. सतत पडणा-या पावसामुळे मध्य, पश्चिम व हार्बर अशा तिनही मार्गांवरील लोकलसेवेवरही परिणाम झाला असून गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.
शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता, संध्याकाळी तो थोडा कमी झाला. मात्र त्यानंतर रात्रभर मुंबबईसह  उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अंधेरी, वांद्रा, बोरिवली या पश्चिम उपनगरांसह घाटकोपर, कांजुरमार्ग, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण या पूर्व उपनगरांधमध्ये पावसाची संततधार कायम आहे. तसेच नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान शहरात काल ( शुक्रवार) रात्री ८ ते (शनिवार) सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची ४४.७२ मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे. 
या जोरदारा पावसाचा फटका मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलसेवेलाही बसला असून मध्य, पश्चिम व हार्बर लोकल उशीराने धावत आहेत. काही ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यानेही लोकल सेवेत अडचण निर्माण झाली आहे. मात्र याचा फटका कामावर निघालेल्या चाकरमान्यांना बसला असून रेल्वे स्थानकांवर गर्दी पहायला मिळत आहे. 
दरम्यान माटुंगा, लोअर परळ, घाटकोपर, अंधेरी यासारख्या भागात पावासाचे पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अंधेरी सबवेमध्ये आजही पाणी साचल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.