शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कोकण, गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; राज्यात जोर ओसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 18:48 IST

राज्यात सर्वाधिक पाऊस राजापूर येथे झाला. तिथे सरासरी 190 मिमी पाऊस पडला.

ठळक मुद्देरत्नागिरी ,सिंधुदुर्गला जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता

पुणे : कोकण, गोव्यात सध्या पावसाचा जोर असून राज्याच्या अन्य भागातील पावसाचा जोर कमी झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राजापूर येथे गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली. राज्यात सर्वाधिक १९० मिमी पाऊस राजापूर येथे झाला. श्रीवर्धन १७०, मालवण, वेगुर्ला १६०, लांजा, सावंतवाडी १५०, मार्मागोवा १४०, दापोली, पेडणे १३०, रत्नागिरी १२०, दाभोलीम, कुडाळ, मुळदे, संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी ११०, देवगड, कणकवली १००, दोडामार्ग, गुहागर, हरनाई, म्हसळा, रामेश्वरी ९०, चिपळूण, खेड, मंडणगड ७०, कोणकोण, मडगाव, वाल्पोई ६०, पोलादपूर, केपे ५० मिमी पावसाची नोंद झाली होती.याशिवाय इतरत्र हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ११०, चांदगड ८०, महाबळेश्वर, शाहुवाडी ७०, पन्हाळा, राधानगरी, सिन्नर ६०, आजरा, गारगोटी ५०, गडहिंग्लज, , पाटण, शिराळा ४०, कागल, खेड, खेड राजगुरुनगर, पुणे लोहगाव ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील परळी वैजनाथ ४०, धर्मबाद ३०, उमरगा १० मिमी पाऊस झाला. विदर्भात सिरोंचा २०, अहिरी, काटोल, मुल १० मिमी पाऊस झाला. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयना (पोफळी) ४०, ताम्हिणी, ३०, दावडी, डुंगरवाडी, शिरगाव, अम्बोणे २० मिमी पावसाची नोंद झाली होती. कोकण वगळता राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवसात मोठ्या पावसाची शक्यता दिसून येत नाही. कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात १९ ते २२ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २१ व २२ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुणे शहर गेल्या २४ तासात गुरुवारी सकाळपर्यंत २१.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. लोहगाव येथे २७़३, पाषाण येथे ५.४ मिमी पाऊस झाला होता. पुढील दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड