मुंबईत जोरदार पाऊस, वाहतूकीचीही कोंडी
By Admin | Updated: May 7, 2014 19:44 IST2014-05-07T17:21:11+5:302014-05-07T19:44:18+5:30
लोणावळा, खोपोलीसह मुंबईतील उपनगरांत बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधा उडाली असून अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.

मुंबईत जोरदार पाऊस, वाहतूकीचीही कोंडी
>
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - मुंबई उपनगरांसह, पुणे तसेच कोकणात बुधवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जोरदार वा-यांसह आलेल्या पावसाच्या सरींमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली.
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झाड कोसळल्याने पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली, तर कर्जतजवळ रेल्वे ट्रॅकवर झाड पडल्याने पुण्याच्या दिशेने निघालेली सिंहगड एक्स्प्रेसही काही काळ खोळंबली.
मुंबईसह उपनगरांत वादळी वारे
दुपारी पाचच्या सुमारास मुंबईसह उपनगरांत वादळी वारे वाहण्यास सुरूवात झाली. ठाणे व नवी मुंबईतही काही काळ धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. परिणामी रस्त्याने चालताना पुढचे काहीच दिसत नव्हते. मुंबई उपनगरांसह नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, कर्जत, नेरळ, खालापूर, खोपोली, लोणावळा, खंडाळा भागात वादळी वा-यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर कोकणात महाड, रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, सिंधुदुर्ग भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.