मुंबईसह उपनगरांत पावसाची जोरदार हजेरी
By Admin | Updated: August 27, 2016 08:42 IST2016-08-27T08:36:51+5:302016-08-27T08:42:44+5:30
शनिवार पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस पडत असून मध्य रेल्वेची वाहूतक १० मिनिटे उशीराने सुरू आहे.

मुंबईसह उपनगरांत पावसाची जोरदार हजेरी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही पहायला मिळत असून शनिवार पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून उसंत घेतलेल्या पावसाने दोन दिवसांत पुन्हा हजेरी लावली आहे.
मुंबई, तसेच पश्चिम व पूर्व उपनगरांसह नवी मुंबईतही तत पाऊस कोसळत आहे. अंधेरी, गोरेगाव, विलेपार्ले, वांद्रे या पश्चिम उपनगरांसह दादर, माटुंगा, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली , कल्याणमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरू आहे.