मुसळधार पावसाने झोडपले

By Admin | Updated: September 2, 2014 01:42 IST2014-09-02T01:42:18+5:302014-09-02T01:42:18+5:30

शहरात पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने दोन ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली.

Heavy rains lashed | मुसळधार पावसाने झोडपले

मुसळधार पावसाने झोडपले

नवी मुंबई : शहरात पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने दोन ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली. अचानक आलेल्या पावसामुळे गणोशोत्सव मंडळांच्या कार्यकत्र्याचीही धावपळ उडाली. 
नवी मुंबईमध्ये रविवारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पालकांनाही पावसात भिजावे लागले. सायंकाळी 6 र्पयत 24.3 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली होती. नेरूळ डी मार्टजवळ वृक्ष कोसळला, सीबीडीमधील आयकर कॉलनीजवळ वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे. बाजार समितीच्या फळ व भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर पाणी साचले होते. 
पावसामुळे गणोशोत्सव मंडळांच्या कार्यकत्र्याना मंडपामध्ये पाणी येवू नये यासाठी धावपळ करावी लागली. मोठय़ा मंडळांनी पाऊस येणार हे गृहीत धरून मंडपाचे काम केले होते. परंतु छोटय़ा मंडळांच्या सभामंडपांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. कार्यकर्ते मंडपातील पाणी बाहेर काढून साफसफाई करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत होते. मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासनाने सर्व विभाग अधिका:यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. 
 
1पनवेल : रविवारबरोबरच सोमवारीही पनवेल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावत गणरायांच्या आगमनाचे स्वागत केले. गाढी आणि पातळगंगा नदया दुथडी भरून वाहत होत्याच. त्याचबरोबर  सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले, मात्र कुठे पावासामुळे जिवीत आणि वित्तहानी झाली नसल्याचे तहसिलदार पवन चांडक यांनी लोकमतला सांगितले.
2गेले काही दिवस विश्रंती घेतलेल्या पावासाने मात्र रविवारी सकाळपासून जोरदार हजेरी लावली. त्यानंतर सोमवारीही तोच जोर राहिला. आज दिवसभर संततधार सुरू असल्याने सखल भागात पाणी साचले होते, त्याचबरोबर शहरातील बावन्न बंगला, सहस्त्रबुध्दे हॉस्पीटल, हरीओम नगर, टपाल नाका, उरण नाका या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. नवीन पनवेल, खांदा वसाहतीत परिस्थीती फारशी वेगळी नव्हती. त्याचबरोबर नालेही दुधाडी भरून वाहत होते. 
3दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने गाढी आणि पातळगंगा नदीच्या पात्रतील पाणी वाढले . कळंबोली वसाहतीत सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. सिडकोने पावसाच्या पाण्यासाठी काढलेल्या नाल्यातूनही पाणी दुथडी भरून वाहत होते. मुंबई- पुणो, मुंबई- गोवा, एनएच-4बी, पनवेल -सायन त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावरील वाहतुक संथ झाली होती. 
4पावसाचा जोर पाहता तहसिलदार पवन चांडक यांनी सर्व नायब तहसिलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी त्याचबरोबर शासकिय अधिका:यांना परिस्थितीवर लक्ष्य ठेवण्याच्या सुचना दिल्या. तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करून त्यामाध्यमातून तालुक्याचा आढावा घेण्यात येत होता.  
5देहरंग आणि गाढेश्वर परिसरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरीता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर पांडवकडा धबधब्यावरही पोलीस वॉच ठेवून  होते. सिडकोच्या होडिंग पॉईंटवर सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. एकंदरीत पाऊस असल्याने गणोश मंडळाच्या देखावे पाहणा:यांची संख्याही रोडावली.
 
रायगड, पेणमधील भातशेती धोक्यात
च्वडखळ : गेले  दोन दिवस मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्याला ऐन गणोशोत्सवात झोडपले असून सततच्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे, तर भातशेती पाण्याखाली गेल्याने भातपीकही धोक्याच्या छायेखाली आहे. 
च्ऐन भातपीक येण्याच्या दिवसातच पावसाने सुरूवात केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. नदी, नाले, ओढे यांना पूर आला असून शेताचे बांध फूटुन हे पाणी भातशेतीत घुसून शेती धोक्यात आली आहे. सुरुवातीला लांबणीवर गेलेला पाऊस आणि त्यानंतर पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे करपल्याने दुबार पेरणीचे ओढवलेले संकट तर अतीवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान तर आता पडत असलेल्या संततधार पावसाने भातशेती अक्षरश: पाणीमय झाले आहे. 
च्बयाच दिवसांनी पाऊस पडल्याने नागरिक सुखावले असले तरी गणोशभक्तांच्या उत्साहावर मात्र विरजण पडलेले दिसून येत होते. गणोशमंडळांचे गणपती पहाणोही यावेळी नागरिकांना पावसाच्या संततधारेमुळे शक्य झालेले नाही. शिवाय खरेदीवर उदासिनता आल्याने बाजारपेठा मंदावलेल्याच एकंदर दिसून येत होत्या.

 

Web Title: Heavy rains lashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.