शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 08:31 IST

जोरदार पावसाने कोकण रेल्वेलाही तडाखा दिला आहे. विशेषत: रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सायंकाळी कोकण रेल्वे मार्गावर वेरवली- विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

मुंबई : वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या सरींनी बोरीवली, जोगेश्वरी, दहिसर, कांदिवली, विक्रोळीसह कुर्ला, घाटकोपर, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळसह भायखळा आणि लगतच्या परिसराची तारांबळ उडवली.

पश्चिम उपनगरात दहिसरमधील सखल भागात किंचित पाणी साचले होते. अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद होता. येथे रस्त्याच्या कडेलगत पाणी साचल्याने वाहतूक धीमी झाली होती. कांदिवलीच्या गांधीनगरमधील भाजीबाजारात पाणी शिरले होते. पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर वाहनांचा वेग कमी झाला होता. बेस्ट प्रवाशांचेही हाल झाले. 

नवी मुंबईमध्ये तीन ठिकाणी वृक्ष काेसळलेठाण्यात सायंकाळी चारनंतर पाऊस कोसळू लागला. मात्र, सहानंतर जोरधारा बरसू लागल्या. तुफानी पावसाने ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरे आणि त्या परिसरातील ग्रामीण भागाला झोडपून काढले. नवी मुंबईमध्ये तीन ठिकाणी वृक्ष काेसळले. तेथील जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय ठाणे-बेलापूरसह सायन-पनवेल महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आदी तालुक्यांतही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अनेक ठिकाणची वीजही गायब झाली.

कोकण रेल्वेला फटकाजोरदार पावसाने कोकण रेल्वेलाही तडाखा दिला आहे. विशेषत: रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सायंकाळी कोकण रेल्वे मार्गावर वेरवली- विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून होत्या. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसही अडकून पडल्या होत्या.

अंदाज... इशारा... आणि आवाहन महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात २१ मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २४ मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. गुरुवार, २२ ते २४ मेदरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळचा समुद्र खवळण्याचा अंदाज आहे. खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. 

पाऊस (मिमी) बोरीवली    ६३ जुहू    ५८ दहिसर    ५७ आरे    ५६ कांदिवली    ५० मालवणी    ४८ पवई    ४७ विलेपार्ले    ४४ सांताक्रूझ    ४३ वर्सोवा    ४१ मरोळ    ४० भांडूप    ३६ दिंडोशी    ३४ मुलुंड    ३४ गोरेगाव    ३२ मालाड    २८ वांद्रे    २५ विक्रोळी    २२ बीकेसी    २० नवी मुंबई (मिमी)बेलापूर    २नेरूळ    १.५०वाशी    ६.६०कोपरखैरणे    १०.६७ऐरोली    ७.६२दिघा    २.६०

टॅग्स :RainपाऊसKonkan Railwayकोकण रेल्वे