शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रविवारच्या सुटीला आनंदसरींची सोबत! अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:53 IST

सिंधुदुर्गमध्ये झाली अतिवृष्टी; मराठवाडा, विदर्भातही कोसळल्या दमदार सरी

पुणे : राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने शनिवारी कोकणातून नगर, मराठवाड्यातील काही भागांतून विदर्भातील गोंदियापर्यंत मजल मारली आहे. येत्या २४ तासांत तो पुणे, मुंबईसह राज्याचा उर्वरित भाग व्यापण्याची शक्यता असून, कोकणासह मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे रविवारच्या सुटीला आनंदसरींची सोबत लाभणार आहे. शनिवारी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २२५ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. विशेष म्हणजे, दुष्काळी मालेगाव, बागलाण, देवळा व सिन्नर तालुक्यात पावसाने जूनची सरासरीदेखील ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही काही ठिकाणी सरी कोसळल्या.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राबरोबरच देशातील छत्तीसगडचा आणखी काही भाग, ओडिशा व प. बंगालचा उर्वरित भाग, तसेच झारखंडचा बहुतांश भाग आणि बिहारच्या काही भाग व्यापला आहे. येत्या २४ तासांत पुणे, मुंबईसह राज्यातील उर्वरित भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात १४ जून रोजी, तर पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात १६ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.पाणी सोडलेशुक्रवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर व धरण परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. दारणा धरण क्षेत्रातील पाणीही थेट नदीत येऊन मिसळल्याने गोदावरीला पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नांदूरमधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाने हजेरी लावली.

14 जून रोजी मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे़

15, 16 जून रोजी कोकणासह पालघर, ठाणे, मुंबईत मुसळधारेची शक्यता आहे. १६ जून रोजी पुणे जिल्ह्यात घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला.

मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल : मान्सून रविवारी मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भागांत तसेच दक्षिण गुजरातमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर व उपनगरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेतली होती. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. रात्री मात्र पावसाच्या सरी अनेक भागांत बरसल्या.

टॅग्स :Rainपाऊस