अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनाही लाभ- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 04:20 AM2020-02-28T04:20:14+5:302020-02-28T04:20:41+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

heavy rain affected farmers will get help from government says ajit pawar | अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनाही लाभ- अजित पवार

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनाही लाभ- अजित पवार

Next

मुंबई : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनाही शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. त्यांनाही लाभ मिळेल याची सरकार काळजी घेईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्हयातील पीककर्जाबाबत मूळ प्रश्न विचारला होता.

ज्वारीच्या काढण्या आता सुरू झाल्या. पीककर्ज कधी देणार अशी विचारणा त्यांनी केली.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी सप्टेंबर २०१९ ही तारीख आहे.पण आॅक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती.या शेतकºयांना नुकसानभरपाई कधी देणार. कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून या शेतकºयांनाही लाभ देण्यात यावा अशी मागणी फडणवीस यांनी केली. भारत भालके यांनी शेतक-यांना कर्ज न देणाºया बँकांवर कारवाईची मागणी केली.

कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु झाली असून तीन महिन्यात या योजनेंतर्गत शेतकºयांना पैसे दिले जातील. त्याचसोबत कर्जमाफीसाठी सप्टेंबर २०१९ ही कट आॅफ डेट आहे. आॅक्टोबरमधील झालेल्या पावसात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही या कर्जमाफीचा फायदा द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अतिवृष्टीने बाधित शेतकºयांनाही कर्जमाफीचा फायदा देण्याचा प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले.

Web Title: heavy rain affected farmers will get help from government says ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.