मुंबई आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 07:17 IST2017-07-02T07:17:07+5:302017-07-02T07:17:07+5:30
मुंबई आणि परिसराला रात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपून काढले. मध्यरात्रीनंतर मुंबई आणि परिसरात सोसाट्याचे वारे

मुंबई आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - मुंबई आणि परिसराला रात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपून काढले. मध्यरात्रीनंतर मुंबई आणि परिसरात सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. तसेच पावसाच्याही जोरदार सरी आल्या. मुंबई शहराबरोबरच उपनगरामधील अंधेरी, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, विरार, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर आदी भागातही मुसळधार पाऊस सुरू झाला. मात्र पाऊस सुरू असला तरी लोकलसेवा सुरळीत सुरू होती.