सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यामध्ये स्वर्गीय स्वरांनी रंगली मैफील
By Admin | Updated: March 23, 2015 02:40 IST2015-03-23T02:40:21+5:302015-03-23T02:40:21+5:30
श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त दिला जाणारा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ रविवारी नागपूर येथील चिटणीस पार्क येथे झालेल्या देखण्या संगीतमय समारंभात प्रदान करण्यात आला.

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यामध्ये स्वर्गीय स्वरांनी रंगली मैफील
लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त दिला जाणारा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ रविवारी नागपूर येथील चिटणीस पार्क येथे झालेल्या देखण्या संगीतमय समारंभात प्रदान करण्यात आला. हजारो संगीत रसिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ स्वीकारताना युवा गझल गायिका पूजा गायतोंडे. यावेळी लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, पुरस्कार विजेता ओजस अढिया, सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार प्रफुल्ल पटेल, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, माजी मंत्री अनिल देशमुख हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रख्यात युवा तबलावादक ओजस अढिया यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम, खासदार प्रफुल्ल पटेल, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, पुरस्कार निवड समितीचे सदस्य शशी व्यास व सन्मानचिन्ह तयार करणारे शिल्पकार प्रा. संदीप पिसाळकर हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.