शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; मुंबईही तापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:05 IST

ऊन, वारा आणि पाऊस; अशा सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्र बेजार असतानाच, यात भर म्हणून आता हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

मुंबई : ऊन, वारा आणि पाऊस; अशा सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलामुळे महाराष्ट्र बेजार असतानाच, यात भर म्हणून आता हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. २३ ते २५ एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येणार आहे. मुंबईचा विचार करता मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर असले, तरी प्रत्यक्षात मात्र उन्हाचा तडाखा आणि वाढता उकाडा मुंबईकरांचा आणखी घाम काढणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मुंबईचा विचार करता, गेल्या आठवडाभरापासून मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे, तर आर्द्रता ८० टक्क्यांच्या आसपास आहे. शिवाय वाढते ऊन तापदायक ठरत असून, उकाड्यातही दिवसागणिक वाढ होत आहे.आकाश राहणार निरभ्रसोमवारससह मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.हवामानाबाबत ‘स्कायमेट’ संस्थेचा अंदाजहॉट सिटी : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा आणि तामिळनाडूमधील अनेक शहरांचे रविवारचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. महाराष्ट्रात परभणीचे कमाल तापमान ४२.१ अंश नोंदविण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील खरगौन येथे ४२, कर्नाटकातील रायचूर येथे ४१, हैद्राबादमधील तिरुपती येथे ४१ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले.हलक्या सरींची नोंदतामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :TemperatureतापमानMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र