शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 02:40 IST

विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आली असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.

पुणे : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट आली असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्रात गेले तीन दिवस आलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता सोमवारी काहीशी कमी झाली़ मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ४३ - ४४ अंशावर गेलेल्या कमाल तापमानात सोमवारी घट नोंदविली गेली. राज्यात अकोला येथे सर्वाधिक कमाल तापमान ४६़९ अंश नोंद झाले. सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे ३४ अंश होते. दक्षिण व मध्य महाराष्ट्रात गेले तीन दिवस उष्णतेने नागरिक हैराण झाले होते़ सोमवारी या भागातील कमाल तापमानात काहीशी घट झाल्याने लोकांना थोडासा दिलासा मिळाला. उत्तर महाराष्ट्रात मात्र अजूनही सूर्यनारायण कोपलाच असून मंगळवारीही येथे उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

विदर्भात ३० एप्रिल रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ मंगळवारी विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. नागपुरात शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत.  नागपुरात पारा ४५ वर पोहचला आहे. हवामान खात्याने आठवडाभर उष्णतेची लाट जिल्ह्यात राहील, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला असून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत आटोपण्याचे आदेश आहेत

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ४०.२, लोहगाव ४१.६, जळगाव ४५.२, कोल्हापूर ३७.२, महाबळेश्वर ३४, मालेगाव ४३.२, नाशिक ३९.२, सांगली ३९.२, सातारा ४०.६, सोलापूर ४३.३, मुंबई ३३.२, अलिबाग ३५.४, रत्नागिरी ३३.३, डहाणू ३७.३, उस्मानाबाद ४३.३, परभणी ४५.८, नांदेड ४४.५, बीड ४४.४, अकोला ४६.९, अमरावती ४६.८, बुलढाणा ४३.५, चंद्रपूर ४६.६, गोंदिया ४३, नागपूर ४४.८, वाशिम ४५, वर्धा ४५.८, यवतमाळ ४५.५़

टॅग्स :Heat Strokeउष्माघात