उष्माघाताने झाला भिकाऱ्याचा मृत्यू
By Admin | Updated: April 20, 2016 16:10 IST2016-04-20T16:10:41+5:302016-04-20T16:10:42+5:30
उष्माघातामुळे मलकापूर येथील भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार अशोक भगवान सोनुने हे मलकापूर येथील रेल्वे स्टेशनवर पत्नीसह भिक मागत होते

उष्माघाताने झाला भिकाऱ्याचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 20 - उष्माघातामुळे मलकापूर येथील भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार अशोक भगवान सोनुने हे मलकापूर येथील रेल्वे स्टेशनवर पत्नीसह भिक मागत होते. १८ एप्रिल रोजी त्यांना उन्हाचा त्रास झाल्यामुळे मलकापूर येथील सामान्य रूग्णालयात भरती केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना २० एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. जिल्हाभरात सध्या तापमान वाढते असून उष्माघाताचे प्रमाणही वाढत असल्याने नागरीकांनी दक्षता घेण्याची तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.