राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांना कार्यक्रमात ह्दयविकाराचा झटका
By Admin | Updated: December 13, 2015 14:01 IST2015-12-13T14:01:45+5:302015-12-13T14:01:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांना ह्दयविकाराचा झटका आला असून, त्यांना उपचारासाठी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांना कार्यक्रमात ह्दयविकाराचा झटका
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांना ह्दयविकाराचा झटका आला असून, त्यांना उपचारासाठी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त कात्रज दूध संघामध्ये रविवारी कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली.
कार्यक्रमात शरद पवार यांच्या आठवणी सांगत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपस्थितांनी त्यांना लगेचच जवळच्या भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे.