शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आ. साळवी कुटुंबीयांच्या याचिकेवर आज सुनावणी; पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 05:55 IST

न्यायालयाने पासबोला यांना संबंधित कागदपत्रे याचिकेला जोडण्याचे निर्देश देत याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवली.

मुंबई - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी शिवसेना (उबाठा गट) आमदार राजन साळवी यांच्या पत्नी व मुलाने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी साळवी यांच्या कुुटुंबीयांना तातडीने दिलासा देण्यास नकार देत याचिकेवर उद्या, मंगळवारी सुनावणी ठेवली. 

राजन साळवी यांच्या पत्नी व मुलगा यांच्या वतीने ॲड. सुदीप पासबोला यांनी न्या. सारंग कोतवाल यांच्या एकलपीठापुढे बाजू मांडली. एसीबीकडे काही कागदपत्रे सादर केली असून, त्या कागदपत्रांच्या आधारे युक्तिवाद करायचा असल्याचे पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने पासबोला यांना संबंधित कागदपत्रे याचिकेला जोडण्याचे निर्देश देत याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवली.

‘अटकेची सूचना नाही’

कोतवाल यांनी एसीबीकडे विचारणा केली की, साळवी यांच्या पत्नी व मुलाला अटक करणार का? त्यावर सरकारी वकिलांनी आपणाला याचिकादारांना अटक करण्याच्या किंवा न करण्याच्या कोणत्याही सूचना नसल्याचे न्यायालयाला सांगितले. एसीबीच्या म्हणण्यानुसार, साळवी आणि त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा ३.५ कोटी रुपयांची जास्त संपत्ती आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय सूडबुद्धीने हा क्षुल्लक गुन्हा आपल्यावर दाखल करण्यात आला आहे, असे साळवी यांच्या पत्नीने व मुलाने याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीHigh Courtउच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे