साध्वीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू
By Admin | Updated: June 11, 2016 04:01 IST2016-06-11T04:01:02+5:302016-06-11T04:01:02+5:30
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेली साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवारपासून युक्तिवादास सुरुवात झाली. या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारीही

साध्वीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेली साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने केलेल्या जामीन अर्जावर शुक्रवारपासून युक्तिवादास सुरुवात झाली. या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारीही सुरू राहणार आहे. दरम्यान, साध्वीच्या जामिनाला विरोध करणारा मध्यस्थी अर्ज तांत्रिक कारणास्तव मागे घेण्यात आला. मालेगाव २००८ प्रकरणी १३ मे रोजी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) सर्व आरोपींवर आरोपपत्र दाखल केले. मात्र या आरोपपत्रातून साध्वीसह अन्य तीन जणांना आरोपींच्या यादीतून वगळले व सर्व आरोपींवरील मोक्काही हटवला. त्यामुळे साध्वीने जामिनावर सुटका करण्यात यावी, यासाठी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. एनआयएने साध्वीच्या जामीन अर्जावर आक्षेप नसल्याचे चारच दिवसांपूर्वी विशेष न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)