पानसरे हत्या सुनावणी; तपास अधिकारी गैरहजर
By Admin | Updated: March 30, 2016 00:18 IST2016-03-30T00:18:17+5:302016-03-30T00:18:17+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच्या सुनावणीस प्रशासकीय कामामुळे तपास अधिकारी डॉ. दिनेश बारी गैरहजर आहेत. त्यामुळे न्यायालयाने पुरवणी तपास अहवाल सादर

पानसरे हत्या सुनावणी; तपास अधिकारी गैरहजर
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच्या सुनावणीस प्रशासकीय कामामुळे तपास अधिकारी डॉ. दिनेश बारी गैरहजर आहेत. त्यामुळे न्यायालयाने पुरवणी तपास अहवाल सादर करण्यासाठी वाढीव पंधरा दिवसांची वेळ द्यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांना केली. त्यावर न्यायाधीश बिले यांनी यापूर्वी तपास यंत्रणेला वीस दिवसांचा वेळ दिल्याची जाणीव करून देत, आणखी सहा दिवसांची वेळ
देत, ४ एप्रिलला पुढील
सुनावणी ठेवली. यावेळी तपास यंत्रणेचा अहवाल पाहून समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोपपत्र निश्चित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)