पानसरे, दाभोलकरसंबंधित याचिकांवर आज सुनावणी
By Admin | Updated: July 11, 2016 05:42 IST2016-07-11T05:42:36+5:302016-07-11T05:42:36+5:30
कॉ. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित एकूण तीन खटल्यांची सुनावणी आज, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात होत आहे

पानसरे, दाभोलकरसंबंधित याचिकांवर आज सुनावणी
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित एकूण तीन खटल्यांची सुनावणी आज, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात होत आहे. त्यामध्ये समीर गायकवाड याला जामीन मिळावा म्हणून त्याच्यावतीने केलेली याचिका, मूळ तपासाबद्दल उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली सुरू असलेली याचिका, समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यास ११ जुलैपर्यंत उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीसंबंधित प्रकरण आदींचा यामध्ये समावेश आहे. पानसरे, डॉ. दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांसाठी वापरलेल्या शस्त्रांमध्ये साम्य आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांनी तसा अहवाल दिला आहे. त्यास दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ‘सीबीआय’नेही दुजोरा दिला आहे. स्कॉटलंड यार्डचा रिपोर्ट लवकर मिळावा, असा पत्रव्यवहार तपास अधिकाऱ्यांनी ‘सीबीआय’कडे केला होता. परंतु, रिपोर्ट प्राप्त न झाल्याने समीरविरोधातील दोषारोपपत्र लांबणीवर पडले. (प्रतिनिधी)