शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरील सुनावणी ८ मार्चला, निवडणुकांसाठी निर्णय घेतल्याचा आक्षेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 06:55 IST

...त्यावर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करू नका, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले. मात्र, सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

मुंबई : मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला बुधवारी केली. त्यावर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करू नका, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने म्हटले. मात्र, सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

‘नोकरीची १६ हजार पदे निर्माण करण्यात आली आहे.  राज्यात ७३ टक्के आरक्षण आहे. खुल्या प्रवर्गासाठी केवळ ३८ टक्के जागा आहेत. मात्र, त्यातही महिला, माजी सैनिक, अनाथ, खेळाडू, अनाथ हे क्षैतिक आरक्षण पकडून खुल्या प्रवर्गाला  केवळ १८ टक्के जागा मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करूनही  निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा आरक्षण देण्यात आले. विशिष्ट समाजावर राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना आरक्षण देण्यात आले. मात्र, खुल्या प्रवर्गामागे कोणताही सामर्थ्यवान नेता उभा नसल्याने त्यांचा कोणीही विचार करत नाही,  असे सदावर्ते यांनी न्यायालयाला सांगितले.

‘शुक्रे व अन्य सदस्यांची नियुक्ती बेकायदा’  मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून (एसईबीसी) सरकारी नोकरी व शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यासंबंधी २० फेब्रुवारीला कायदा मंजूर झाला आणि २६ फेब्रुवारीला राज्यपालांनी मंजुरी दिली.  त्याला सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तसेच मागास प्रवर्ग आयोगावर निवृत्त न्या. सुनील शुक्रे व अन्य सदस्यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावाही याचिकेद्वारे करण्यात आला आहे.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणCourtन्यायालय