शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; विधानसभाध्यक्ष दिल्लीहून परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 06:22 IST

निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही; परंतु घाईदेखील करणार नाही

मुंबई - आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांच्या प्रमुखांना बोलावले जाऊ शकते.सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री आपल्या दिल्ली भेटीत विधिज्ञांशी सविस्तर चर्चा केली.

दिल्लीहून परत आल्यानंतर शुक्रवारी मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नार्वेकर म्हणाले, दिल्लीत माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. तसेच अनेक भेटीगाठी होत्या. त्यातील काही भेटी या कायदेतज्ज्ञांसोबत होत्या. आमदार अपात्रतेसंदर्भात जो कायदा आहे त्याच्यात परिस्थितीनुसार वेगवेगळे बदल होत असतात. 

दिरंगाई नाहीच; पण घाईही नाहीआमदार अपात्रतेच्या बाबतीत मी सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याने अधिक बोलणे उचित ठरणार नाही. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. संविधानाने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना आपापले कार्यक्षेत्र आखून दिले आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून सर्वांनी काम करणे अपेक्षित आहे. निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही; परंतु घाईदेखील करणार नाही. सर्व नियम, कायदेशीर आणि संवैधानिक तरतुदी यांचे योग्यरीत्या पालन करूनच मी निर्णय घेईन, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट असताना विधानसभा अध्यक्षांनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्यासाठी दिल्लीत जावे लागत असेल, तर मनातील शंकांना बळ मिळते. - खा. संजय राऊत, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 

कागदपत्रे मिळाली नाहीत, या नावाखाली वेळकाढूपणा सुरू असला, तरी आठवडाभरात निर्णय करावाच लागणार आहे. विधान परिषदेच्या ३ आमदारांच्या अपात्रतेबाबतही आम्ही यापूर्वीच याचिका दाखल केली आहे.- अनिल परब, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRahul Narvekarराहुल नार्वेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे