गोविंद पानसरे हत्या खटल्याची आज सुनावणी

By Admin | Updated: February 9, 2016 00:57 IST2016-02-09T00:57:58+5:302016-02-09T00:57:58+5:30

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने हा खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका

Hearing of Govind Pansare murder case today | गोविंद पानसरे हत्या खटल्याची आज सुनावणी

गोविंद पानसरे हत्या खटल्याची आज सुनावणी

कोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने हा खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका उच्च न्यायालयात केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
खटला सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी वा मुंबईत वर्ग करावा, अशी याचिका त्याच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होत आहे. पानसरे कुटुंबीयांतर्फे ज्येष्ठ वकील अभय नेवगी, तर शासनातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या बाजू मांडतील. १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्यापुढे समीरवर दोषारोपपत्र दाखल झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing of Govind Pansare murder case today