दुष्काळग्रस्त शेतक-यांना प्रीती झिंटाने दिला मदतीचा हात
By Admin | Updated: April 5, 2015 18:41 IST2015-04-05T15:36:25+5:302015-04-05T18:41:51+5:30
दुष्काळ व अवकाळी पाऊस असा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या शेतक-यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने मदतीचा हात दिला आहे.

दुष्काळग्रस्त शेतक-यांना प्रीती झिंटाने दिला मदतीचा हात
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - दुष्काळ व अवकाळी पाऊस असा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या शेतक-यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने मदतीचा हात दिला आहे. प्रीतीने सिन्नरमधील निहाळे गावातील २० शेतक-यांना आर्थिक मदत दिली असून दुग्ध व्यवसायासाठी तिने ३ शेतक-यांना गोदानही केले आहे.
राज्यातील शेतकरी नैसर्गिस संकटांनी हवालदील झाला असून सरकारने शेतक-यांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. शेतक-यांच्या मदत मिळावी अशी मागणी करणारे अनेक असले तरी शेतक-यांना स्वतःच्या खिशातून मदत करणारे त्या तुलनेत कमीच आढळतात. अभिनेत्री प्रीती झिंटा याला अपवाद ठरली आहे. प्रीतीने कोणताही गाजावाजा न करता सिन्नरमधील निहाळे गावातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचा हात दिला. प्रीती गावात आल्याचे प्रसारमाध्यमांना उशीराने कळले व मग हा सर्व प्रकार समोर झाला. निहाळे गावाला टँकरची गरज भासल्यास तुम्ही मला सांगा, मी स्वतः यासाठी आणखी मदत करायला तयार आहे असे आश्वासनही प्रीतीने शेतक-यांना दिले. प्रीतीच्या या आदर्शवत कार्याचे अन्य कलाकारही पालन करतील अशी आशा आहे.