जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि लोकमत आयोजित हेल्दी बेबी कॅम्प
By Admin | Updated: July 31, 2016 01:49 IST2016-07-31T01:49:30+5:302016-07-31T01:49:30+5:30
हेल्दी बेबी कॅम्प ही जागृत करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व लोकमत एका भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे.
_ns.jpg)
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि लोकमत आयोजित हेल्दी बेबी कॅम्प
मुंबई : हेल्दी बेबी कॅम्प ही जागृत करणारी संकल्पना घेऊन जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व लोकमत एका भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे. सुदृढ निरोगी बाळ प्रत्येक माता-पित्यांचे स्वप्न असते. चांगली व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशा टप्प्याटप्प्याने विकसित होणारी आपली संस्कृती आणि त्यात बदल घडविणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या भारतातील सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅण्ड आणि आपली सामाजिक बांधिलकी जपत जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे लोकमत यांनी यादृष्टीने हे पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे.
१०० हून अधिक वर्षासाठी जॉन्सन बेबी हे बाळाच्या शुश्रूषा विज्ञानांमध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे. ज्यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास आणि म्हणूनच जॉन्सनचे उत्पादन आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आले असून जगभरातील हजारो मातांद्वारे खऱ्या अर्थाने घरांमध्ये चाचणी केली जाते, ज्यावर असतो मातेचा संपूर्ण विश्वास. ज्या विश्वासावर तिचं बाळ घडत जातं.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. अशा प्रकारचे आयोजन सातत्याने केले जाते.
मागील वर्षी पण अशा पद्धतीचे कार्यक्रम संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रात राबविले गेले होते. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून हेल्थ जागृती वाढवून येणाऱ्या पिढीला संजीवनी देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमार्फत होणार आहे हे निश्चित. तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी यानिमित्ताने जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा समस्त पालकांनी घ्यावा आणि या कॅम्पला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कअढ इंडियन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे जी आरोग्याच्या सुधारणेसाठी आणि बाळांच्या हितासाठी सतत झटत असते. याच अनुषंगाने डॉ. समीर दलवाई यांच्या
नेतृत्वाखाली सूर्यवंशी
सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, कॅटरिंग कॉलेजसमोर, दादर (प.) येथे या कॅम्पचे आयोजन केले आहे.
उद्या रविवारी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत होणार आहे. कार्यक्रम नि:शुल्क असून सर्व पालकांसाठी खुला आहे. कॅम्पमध्ये आपल्या बाळांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्नांचा विचार करून त्यावर सखोल मार्गदर्शन केले जाईल. (प्रतिनिधी)
सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाळाला सहभाग प्रमाणपत्र, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनतर्फे आकर्षक गिफ्ट हँपर देण्यात येईल. तसेच संपूर्ण परिवारासाठी एक नावीण्यपूर्ण इन्स्टंट फोटो बुथ उपलब्ध केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक परिवारास स्वत:चे अविस्मरणीय फोटोफ्रेम भेट मिळणार आहे.
अधिक माहितीकरिता संपर्क- ८६५२२००२२१/९८३३८६९२२३