लाचखोर लिपिकासह मुख्याध्यापक निलंबित
By Admin | Updated: May 2, 2015 01:03 IST2015-05-02T01:03:11+5:302015-05-02T01:03:11+5:30
प्रभारी मुख्याध्यापकाकडून बदलीसाठी लाच घेणारा तळोदा प्रकल्प कार्यालयातील लिपिक व राज्यपाल दौऱ्याप्रसंगी विनापरवानगी गैैरहजर राहणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे़

लाचखोर लिपिकासह मुख्याध्यापक निलंबित
तळोदा (जि. नंदुरबार) : प्रभारी मुख्याध्यापकाकडून बदलीसाठी लाच घेणारा तळोदा प्रकल्प कार्यालयातील लिपिक व राज्यपाल दौऱ्याप्रसंगी विनापरवानगी गैैरहजर राहणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे़
तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या सुनील पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ४५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती़ सुनील पाटील यास निलंबित करण्यात आले आहे़ तसेच बर्डी आश्रमशाळेतील प्रभारी मुख्याध्यापक आऱ टी़ माळी हे राज्यपाल दौरा व प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणास गैरहजर राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)