रस्त्यांच्या खोदकामांची डोकेदुखी
By Admin | Updated: December 25, 2014 02:52 IST2014-12-25T02:52:56+5:302014-12-25T02:52:56+5:30
मुंबईचा खडतर मार्ग सुकर करण्यासाठी पालिकेने दीड हजार कोटींची रस्त्याची कामे हाती घेतली आहेत़ मात्र निवडणुकीच्या कामात

रस्त्यांच्या खोदकामांची डोकेदुखी
मुंबई : मुंबईचा खडतर मार्ग सुकर करण्यासाठी पालिकेने दीड हजार कोटींची रस्त्याची कामे हाती घेतली आहेत़ मात्र निवडणुकीच्या कामात रेंगाळलेली शेकडो रस्त्यांची कामे शहरात एकाच वेळी सुरू झाली आहेत. यामुळे दररोजच्या वाहतूककोंडीने आॅफिसला लागणारा लेटमार्क आणि धुळीमुळे मुंबईकर मेटाकुटीस आले आहेत़
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने पंचवार्षिक कार्यक्रम आखला आहे़ या अंतर्गत सुमारे साडेसात हजार कोटींची रस्त्यांची कामे होणार आहेत़ त्यानुसार सध्या चर्चगेट ते दहिसर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंडपर्यंत सुमारे ३०० रस्त्यांचे काँक्रिटीकरण अथवा डांबरीकरणाचे काम सुरू
आहे़
पालिकाच नव्हे तर अन्य सरकारी प्राधिकरणांची खोदकामेही एकाच वेळी सुरू असल्याने मुंबईकरांचे नाहक हाल सुरू आहेत़ (प्रतिनिधी)