कर्ज फेडण्यासाठी त्याने रचले अपहरणाचे नाट्य
By Admin | Updated: November 7, 2016 05:59 IST2016-11-07T05:59:41+5:302016-11-07T05:59:41+5:30
कर्जफेडीसाठी सिन्नरच्या एका तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य रचून वडिलांना खंडणीसाठी धमकावले. हा धक्कादायक प्रकार नाशिकरोडमधून पोलिसांनी उघडकीस आणला.

कर्ज फेडण्यासाठी त्याने रचले अपहरणाचे नाट्य
नाशिक : कर्जफेडीसाठी सिन्नरच्या एका तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य रचून वडिलांना खंडणीसाठी धमकावले. हा धक्कादायक प्रकार नाशिकरोडमधून पोलिसांनी उघडकीस आणला.
सिन्नर येथील योगेश दौलत झाडे (३२, रा. चिंचोली) व त्याचा मोठा भाऊ शिवाजी दौलत झाडे एका चायनिजच्या गाडीवर उभे असताना योगेशचे अपहरण करून त्याचा हॉटेल व्यवसायातील भागीदार रुपेश शिंदे याच्याकडे ‘दोन लाख रुपये पाहिजे, तुझ्या मित्राला उचलले आहे’ असा संवाद अज्ञात अपहरणकर्त्यांनी अपहृत योगेशच्या भ्रमणध्वनीवरून साधला आणि फोन बंद केला. त्यामुळे सिन्नर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.
मात्र तपासाअंती रविवारी अपहरणाचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. तसेच योगेशला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकरोडच्या एका लॉजमधून ताब्यात घेतले. ‘हॉटेल व्यवसायामुळे दोन लाखांचे कर्ज झाले. ते फेडण्यासाठी अपहरणाचे नाट्य रचत वडिलांकडून दोन लाखांची मागणी केल्याची कबुली योगेशने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)