‘त्या’ 14 मुलांचे छत्र हरवले!

By Admin | Updated: August 3, 2014 01:21 IST2014-08-03T01:21:40+5:302014-08-03T01:21:40+5:30

शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेल्या माळीण गावातील 14 मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आह़े आई-वडिलांसह कुटुंबातील बहुतेकांचा या दुर्घटनेत अंत झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

'He' lost the umbrella of 14 children! | ‘त्या’ 14 मुलांचे छत्र हरवले!

‘त्या’ 14 मुलांचे छत्र हरवले!

घोडेगाव (जि. पुणो) : शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेल्या माळीण गावातील 14 मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवले आह़े आई-वडिलांसह कुटुंबातील बहुतेकांचा या दुर्घटनेत अंत झाल्याची भीती व्यक्त होत आहे. 
माळीण गावातील अनेक मुले  घोडेगाव, शिनोली, मंचर व पुणो
येथे शिक्षणासाठी  राहत होती. आतार्पयत 14 मुले गावात आली आहेत. गावातील दृश्य पाहून ती सुन्न झाली. या घरींची झालेली अवस्था पाहून त्यांना काही सुचेनासे झाले आहे. 
ऐश्वर्या सुनील झांजरे ही घोडेगाव येथे शिक्षण घेते व येथेच वसतिगृहात राहते. रेश्मा भागु झांजरे ही शिनोली येथे बारावीत शिकत आहे व येथेच वसतिगृहात राहते. राहुल लुमाजी लेंभे हा मुलगाही शिनोली येथे बारावीत शिक्षण घेतो व येथेच वसतिगृहात राहतो. 
समिन लुमा लेंभे, सतीश लुमा लेंभे, प्रवीण शेळके, संतोष भागु दांगट, दिलीप कैशास शेळके, मच्छिंद्र विठ्ठल दांगट, अश्विनी दत्तात्रय पोटे, लक्ष्मण कमाजी पोटे हे विद्यार्थी आहेत. आई-वडीलांसह कुटुंबातील सर्व जणांचा अंत झाल्याने ते उघडय़ावर आले आहेत. 
या सर्व मुलांची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी वैयक्तिकरित्या घेण्याचे जाहीर केले आहे. शासनाकडून या मुलांना जी मदत मिळेल त्या शिवाय त्यांना संपूर्ण आधार देण्याचे, त्यांचे शिक्षणापासून सर्व आईवडिलांप्रमाणो जबाबदारी घेण्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी शानिवारी जाहीर केले आहे. (वार्ताहर)

 

Web Title: 'He' lost the umbrella of 14 children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.