शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ सोडलं गाव कामासाठी : ‘यांनी’ शोधलं पोटापाण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:54 IST

स्थलांतरितांच्या गावात विहिरी खोदून कर्नाटकातील कुटुंब भरताहेत पोट

ठळक मुद्देमाळशिरस तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतमजूर तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित झालेशेतकरी पाण्याच्या शोधात विहिरींची खोदाई करून शेतीची व स्वत:ची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करत आहेतपोटापाण्याच्या शोधासाठी कर्नाटकातून आलेल्या अनेक कुटुंबांनी कामातून आधार शोधला

एल. डी. वाघमोडे

माळशिरस : तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतमजूर तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत़ शेतकरी पाण्याच्या शोधात विहिरींची खोदाई करून शेतीची व स्वत:ची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काहींनी गाव सोडलं असलं तरी याच स्थलांतरितांच्या गावामध्ये पोटापाण्याच्या शोधासाठी कर्नाटकातून आलेल्या अनेक कुटुंबांनी कामातून आधार शोधला आहे. 

दिवाळी संपताच कर्नाटकातील ही कुटुंबं पाण्याचे स्रोत असणाºया भागांमध्ये भ्रमंती सुरू करतात. शहराच्या बाजूला मैदानामध्ये हे उतरतात़ आपण विहिरी खोदायचे काम करत असल्याचे फलक लावून जाहिरात करतात़ त्यानुसार आसपासचे शेतकरी त्यांना येऊन भेटतात़ शेतकरी आणि त्यांच्यात करार होतो़ त्यानंतर हे कुटुंब प्रत्यक्ष विहीर खोदायच्या कामाला सुरुवात करते़ सुरेश राठोड यांचे कुटुंब कुडगीतांडा (ता. बसवनबागेवाडी, जि़ विजयपूर) माळशिरस तालुक्यात दाखल झाले आहे़ त्यांची पत्नी कांताबाई, पाचवीतून शाळा सोडून आलेली १४ वर्षांची मुलगी आक्रोना तर सहावीतून शाळा सोडून आलेला चंद्रशेखर हा मुलगा, भाऊ महादेव राठोड, त्याची पत्नी शारूबाई राठोड आणि त्यांची दोन लहान मुले असे हे कुटुंब सध्या भांबुर्डी परिसरात विहीर खोदायचे काम करीत आहे.

यातील महिला कांताबाई स्वत: क्रेन चालवतात तर त्यांची मुले क्रेन बाजूला ढकलणे आणि विहिरीत खोदलेले दगडगोटे वर भराव्यावर व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात़ दिवाळीपासून जून महिन्यापर्यंत या परिसरात १० ते १५ विहिरींची खोदाई करतात. 

असा होतो करार- प्रथमत: विहिरीची पाहणी करतात, त्यानंतर त्या विहिरीतील खडकांच्या थराचा अंदाज घेऊन विहिरीची लांबी व रुंदी यानुसार प्रति फुटाला आठ ते दहा हजार रक्कम घेण्याचा करार केला जातो़ यामध्ये काम सुरू असताना विहिरीत येणारे पाणी विहिरीबाहेर टाकणे आवश्यकता असल्यास खडकांना ब्लास्टिंगच्या साह्याने फोडणे आदी गोष्टींचा समावेश असतो़ यात कुटुंबातील प्रत्येक महिला क्रेन अगदी सफाईने चालवतात तर पुरुष मंडळी विहिरीतील दगडगोटे भरून क्रेनद्वारे वर पाठवतात.

व्यवसाय म्हणून आम्ही क्रेनद्वारे विहिरी खोदायचं काम करतो़ पूर्ण हंगामात आठ ते दहा लाखांपर्यंत पैसे मिळतात, मात्र त्यामधून खर्च वजा जाता दोन लाखांपर्यंत नफा आम्हाला मिळतो़ त्यानंतर पाऊस पडला की गावाकडे जाऊन शेतीतील कामांना सुरुवात करतो़ - सुरेश राठोड, कुटुंबप्रमुख, कर्नाटक

सध्या विहिरीची खोदाई सुरू केली आहे़ किमान पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होईल व भविष्यात पाऊस पडल्यानंतर शेतीला या पाण्याचा चांगला उपयोग होईल़ या हेतूने खोदाई केली जात आहे.- दत्तात्रय नरळे, शेतकरी, भांबुर्डी

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायdroughtदुष्काळWaterपाणीTemperatureतापमानKarnatakकर्नाटक