पत्नीचा खून करून प्रेत जाळले
By Admin | Updated: December 24, 2016 19:42 IST2016-12-24T19:42:21+5:302016-12-24T19:42:21+5:30
दिसायला चांगली नसल्याच्या कारणावरून कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथे पत्नीचा घरातच खून करून प्रेत जाळल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली.

पत्नीचा खून करून प्रेत जाळले
ऑनलाइन लोकमत
कळमनुरी, दि. 24 - दिसायला चांगली नसल्याच्या कारणावरून कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथे पत्नीचा घरातच खून करून प्रेत जाळल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली.
मयत कविता खंदारे (२७) हिस तू दिसायला चांगली नाही. वाळलेली आहे, या कारणावरून सासरच्या मंडळीकडून सतत शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता, अशी तक्रार तिच्या भावाने दिली आहे. यातूनच तिला २४ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या पूर्वी जीव मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत गावातील पाणंद रस्त्यावरील कचºयात नेवून जाळले. यात प्रेत पूर्णपणे जळून खाक झाले. २४ डिसेंबर सकाळी ग्रामस्थांनी जळालेले प्रेत पाहिले व माहिती पोलिस ठाण्याला दिली. सुरुवातीला कविताने आत्महत्या केल्याचे सांगून बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही मयताच्या नातेवाईकांनी केला. राहुल सुदाम इंगळे यांच्या फिर्यादीवरून भानुदास किसन खंदारे (पती), नीलाबाई खंदारे (सासू), सुरेश खंदारे (चुलत दीर) या तिघांविरूद्ध कलम ३०२, २०१, ४९८, (अ) ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोनि कुंदनकुमार वाघमारे, सपोनि सुधाकर आडे, गजानन बर्गे, एन.एस. पवार, बांगर, थिटे घटनास्थळी गेले व पंचनामा केला. सेलसुरा येथेच मयताचे शवविच्छेदन डॉ. दिलीप मस्के यांनी केले. घटनास्थळाला पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी भेट दिली. तिन्ही आरोपींना अटक केल्याचे सपोनि आडे यांनी सांगितले.