शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

त्याने केवळ बॉडी नाही तर इमेज बिल्ड केली.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 09:01 IST

त्याचे वडील, काका, आजोबा असे सर्वजण पहिलवान. कुस्ती तर त्याच्या घरात रंगणारा नेहमीच खेळ. त्याच्याही मनात कुस्तीपटू होण्याची इच्छा होती. मात्र.....

पुणे :त्याचे वडील, काका, आजोबा असे सर्वजण पहिलवान. कुस्ती तर त्याच्या घरात रंगणारा नेहमीच खेळ. त्याच्याही मनात कुस्तीपटू होण्याची इच्छा होती. मात्र एकदा झालेल्या दुखापतीमुळे त्याने कुस्तीला कायमचा रामराम ठोकला आणि बॉडी बिल्डिंगचा रस्ता पकडला.पण हा रस्ता सोपाही नव्हता आणि स्वस्तही. ही गोष्ट आहे नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातील लहानशा धायगावणे गावाच्या जुबेर शेखची. 

आज त्याला प्रतिदिन दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिथून कोणतीही मदत करणे शक्य नाही. त्यामुळे जमेल तशी मेहनत करून तो त्याचा बॉडीबिल्डिंग करतो आहे. सुरुवातीला खर्च परवडत नसल्याने तो सुप्यात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या घरी राहिला. तिथून पुण्यात आल्यावर त्याने बाउन्सर म्हणूनही काम केले. या दरम्यान पुणे श्री, मिस्टर इंडिया, महाराष्ट्र श्री बक्षिसांवर त्याने नाव कोरले. नुकतेच त्याने मिस्टर एशिया स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. सध्या तो सकाळी आणि संध्याकाळी मिळून दहा तास सराव करतो. जिम ट्रेनर म्हणून काहींना मार्गदर्शनही करतो. मात्र या साऱ्यातूनही त्याला आर्थिक अनेक अडचणींना  सामोरे जावे लागत आहे. आयुष्यात आव्हाने नसतील तर जगण्यात मजा नाही असे त्याचे मत आहे. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज असते असे त्याला वाटते. 

सध्याचे तरुणांना लागलेले बॉडी बनवण्याचे वेड बघून तो म्हणतो, ''बॉडी तयार करणे हा सध्या खेळ झाला आहे. योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम करून जे साध्य करता येते ते महागडे पदार्थ सेवन करून केले जात आहे. या वेडापायी अनेक जण सुदृढ शरीराचा नाश करून घेत आहेत.त्यामुळे बॉडी नाही तर चांगली इमेज बिल्ड करण्याची गरज आहे.'' कष्टाने स्वप्न साकारून देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या वीराला पुढील प्रवासासाठी कोट्यवधी शुभेच्छा !

एक वेळ अशी होती की... 

जुबेरला गरज असताना प्रत्येक वळणावर कोणी ना कोणी दाता भेटला. एक वेळ अशी होती की, त्याने पुण्यातले सर्व संपवून घरी जाण्याचे ठरवले. इथला राहण्याचा आणि तयारीचा खर्च पेलणे अशक्य बनले आणि त्याने निराशेने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात त्याने बाउन्सर म्हणून कामाला सुरुवात केली आणि आशियात तिसरा येण्याची किमया साधली.                                                                                                                                                                                                                               

टॅग्स :Puneपुणेbodybuildingशरीरसौष्ठव