तो आला, आईस्क्रीम खाल्लं अन् निघून गेला !

By Admin | Updated: April 20, 2017 16:14 IST2017-04-20T16:14:11+5:302017-04-20T16:14:11+5:30

उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेलं एक माकड चक्क आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रवेशकर्ते झाले

He came, got ice cream and went away! | तो आला, आईस्क्रीम खाल्लं अन् निघून गेला !

तो आला, आईस्क्रीम खाल्लं अन् निघून गेला !

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात कमालीची वाढ नोंदवली गेली आहे. उन्हा-तान्हातून फिरल्यास अंगाची लाही लाही झाल्याशिवाय राहत नाही. अनेकदा या कडाक्याच्या उन्हात जीव तहानेने व्याकूळ होतो. मात्र फक्त माणसांचाच नव्हे, तर पाणिमात्रांचाही या कडक उष्म्यानं जीव कासावीस होतोय.

अनेक पाणीमित्र पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर पाण्याचं भांडं ठेवतात. जेणेकरून मुक्या पशू-पक्ष्यांची तहान भागू शकेल. अशातच उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेलं एक माकड चक्क आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रवेशकर्ते झाले. मग काय माकड आलं म्हटल्यावर आईस्क्रीम पार्लरमधल्या कामगारांचीही तारांबळ उडाली. त्यानंतर कामगारांनी त्या माकडाला एक आईस्क्रीमही खाण्यासाठी दिलं. आईस्क्रीमचा आस्वाद घेतल्यानंतर माकड तिथेच फॅनच्या थंड गारव्यात टेबलावरच थोडं पहुडलं.

थोड्या वेळानं उठून ते माकड पुन्हा जंगलात निघून गेलं. या सर्व प्रकरणामुळे आईस्क्रीम पार्लरमधील कर्मचा-यांनाही काहीचा वेगळा अनुभव घेता आला. अनेकांनी त्या माकडाला कॅमे-यामध्ये कैद केलं.

Web Title: He came, got ice cream and went away!