अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: May 15, 2016 18:59 IST2016-05-15T18:59:51+5:302016-05-15T18:59:51+5:30
नेवासा येथून अंबादास लष्करे याच्या नावाने अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. पारनेर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे

अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १५ : नेवासा (जि. अहमदनगर) येथून अंबादास लष्करे याच्या नावाने अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. पारनेर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
नेवासा येथील अंबादास लष्करे याच्या नावाने 11 महिन्यात 6 वेळा गंभीर स्वरुपाचे धमकीपत्र आलेले आहे. गेल्या 8 महिन्यातील हे सलग 5 वे पत्र असूनही नगर पोलिसांना अद्याप पत्र लिहिणारा आरोपी सापडलेला नाही. त्यामुळे नगर पोलिसांसाठी हे एक आव्हान बनले आहे.