शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास, वैतरणा, सूर्या, तानसा, वसिष्ठी नद्यांची प्रदूषण पातळी धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 04:21 IST

महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांतील प्रदूषण धोकादायक स्तरावर आहे, असे जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले.

 - नितीन अग्रवालनवी दिल्ली : महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांतील प्रदूषण धोकादायक स्तरावर आहे, असे जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले, देशातील ३२३ नद्यांमध्ये एकूण ३५१ भागांत प्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात ५३ नद्या महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील सावित्री, सूर्या, तानसा, उल्हास, वैतरणा आणि वसिष्ठी या नद्यांचा समावेश आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडील ताज्या आकडेवारीचा हवाला देऊन कटारिया यांनी सांगितले की, महाराष्ट्रात गोदावरी, काळू, कुंडलिका, मिठी, मोरना, मुळा, मुठा नीरा, वेल, भीमा, इंद्रायणी, पवना, वैनगंगा, वर्धा आणि घोड यांचा समावेश आहे. याशिवाय कन्हान, कोलार, कृष्णा, मोर, पाताळगंगा, पेठी, पैनगंगा, पूर्णा, तापी, उरमोडी, वेण्णा, वाघूर, बिंदूसरा, बोरी, चंद्रभागा, दारणा, गिरणा, हिवरा, कोयना, पेहलार, सीना, तितूर, अंबा, भातसा, गोमई, कान, मंजिरा, पंचगंगा, पंजारा, रंगावली या नद्याही कमालीच्या प्रदूषित आहेत.एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कटारिया म्हणाले की, राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड प्रदूषण निगरानी समित्यांसोबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी) निगरानी केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमातून नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासत असते. सीपीसीबीच्या अहवालात पाण्यात जैव रासायनिक आॅक्सिजनच्या पातळीच्या आधारावर नद्यांमध्ये किती प्रदूषण आहे हे ठरते.उपाययोजना सुरूनमामि गंगे, राष्ट्रीय नदी संरक्षण योजना, अटल नविनीकरण आणि शहरी परिवर्तन मिशन (अमृत), राष्ट्रीय जलीय पारिस्थिती प्रणालीच्या संरक्षण योजनेअंतर्गत (एनपीसीए) केंद्र सरकारकडून राज्य आणि शहरी शाखेला मदत दिली जाते.कटारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रदूषित नदी खंड आसाम (४४), मध्य प्रदेश (२२), केरळ (२१), गुजरात (२०), ओडिशा (१९) आणि पश्चिम बंगालमध्ये (१७) आहेत.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण