शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही लिहायला, वाचायला शिकलात ना, ते काँग्रेस पक्षाचं देणं; सुळेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 08:40 IST

सर्वसामान्य मायबाप जनतेला या सरकारमध्ये काहीही मिळालेलं नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे असं त्यांनी सांगितले. 

पुणे - Supriya Sule on BJP ( Marathi News ) एका बाजूला काँग्रेस आणि एका बाजूला भारतीय जनता पक्ष. पुण्यामध्ये वीज कोणी आणली ? शाळा कोणी आणल्यात ? हॉस्पिटल कोणी आणलं ? कारखाने कोणी काढलेत ? आयटी कोणी आणली ? पुण्यामध्ये सर्व मोठे ब्रिज कोणी बांधले ? रस्ते मोठे कोणी केले ? फोन कोणी आणलेत ? व्हाट्सअप कोणी आणलं ? इंस्टाग्राम कोणी आणलं ? बँका कोणी काढल्यात ? हे सर्व काँग्रेस पक्षाने केलं. संसदेत आम्हाला जे सुनावतात ना त्यांना मी सांगते की, तुम्ही जे लिहायला, वाचायला शिकलात ना ते काँग्रेस पक्षाचे देणे आहे म्हणून तुम्ही शिकलेला आहात अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला. 

पुण्यात झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या की, सरकार जर सर्वच गोष्टी प्रायव्हेट कंपन्यांना देणार असेल, तर आम्ही टॅक्स कशासाठी भरायचा ? हे सर्व जे बोलतात ना, आम्ही विकास करतो, विकास करतो ते कोणाच्या पैशांनी करतात तुमच्या घरातून ते पैसे येत नाही. आम्ही टॅक्स भरतो. आम्ही जीएसटी भरतो त्यामुळे हा विकास होतो या सरकारला पॉलिसी पॅरालिसीस झालेला आहे. सर्वसामान्य मायबाप जनतेला या सरकारमध्ये काहीही मिळालेलं नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी राजकारणात कशासाठी आली तर तुमच्या जीवनात एक वेगळा बदल घडवण्यासाठी आली आहे आणि तीन गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सर्वांनी काम केले पाहिजे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान; सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा, त्यामुळे ही संघर्षाची लढाई मला भीतीदायक वाटत नाही. मी शिवछत्रपतींचे नाव घेते आणि ज्यांचे संस्कार आमच्यावर झाले ते कैलासवासी यशवंतराव चव्हाण. ते फक्त फोटो पुरतं नाही तर, आमच्या कामातूनच दिसते असा टोला सुप्रिया सुळेंनीअजित पवार गटाला लगावला. 

दरम्यान, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांचे मी आभार मानते. गेले ३ दिवस-रात्र आपण या आक्रोश मोर्चात सहभागी झालात. लोकांपर्यंत पोहोचलात. एक वेगळा आक्रोश आणि हा निरोप मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे याचे सर्वात मोठे यश आणि पोचपावती म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री हे पहिल्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत त्यातच आपल्याला यश मिळालेले आहे असंही सुळेंनी म्हटलं. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाAjit Pawarअजित पवार