घृणास्पद ! बापच करत होता अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार
By Admin | Updated: May 11, 2017 19:49 IST2017-05-11T19:49:23+5:302017-05-11T19:49:23+5:30
पोटच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बापानेच बलात्कार केल्याची घटना धायरीतील रायकर मळा येथे उघडकीस आली

घृणास्पद ! बापच करत होता अल्पवयीन मुलीवर सातत्याने बलात्कार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 11 : पोटच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर बापानेच बलात्कार केल्याची घटना धायरीतील रायकर मळा येथे उघडकीस आली असून, सिहंगड पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. पीडित मुलीनेच सिहंगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा
प्रकार समोर आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अवघ्या पंधरा वर्षांची आहे. बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार अधधिनियम अन्वये बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा (वय 36.रा. रायकर मळा धायरी) रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी त्याला सोडून गेली होती. शिक्षणानिमीत्त वडिलांकडेच राहिलेल्या पीडित मुलीवर बापानेच फेब्रवारी २०१६ पासून वेळोवेळी बलात्कार केला असून, याबाबत कोणास काही सांगितल्यास मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुललीने तक्रार दिल्याचे समजताच आरोपी पसार झाला. त्याचा कुठेही राहण्याचा ठाव ठिकाणा नव्हता तरीही पोलीस आपल्या मागावर आहेत याची कुणकुण त्याला लागल्याने त्याने मोबाईलचा वापर बंद केला. स्वत:ची ओळ्ख लपवून ठेवत राहण्याची अनेक ठिकाणे वेळोवेळी तो बदलत होता.पोलिसांनी खबरीचे जाळे तयार करुन सतत चार दिवस अहोरात्र नवी मुंबई, अंधेरी, ठाणे इत्यादी ठिकाणी आरोपीचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली. अखेरीस मानगाव, जिल्हा रायगड येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
या प्रकरणाचा तपास परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे , सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग निलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बबन खोडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जीवनमोहिते, सहायक पोलीस फौजदार यशवंत ओंबासे, निलेश जमदाडे, पोलीस शिपाई राहुल शेडगे यांनी शिताफीने व कौशलल्याने आरोपीचा पाठपुरावा करून त्याला ताब्यात घेतले.