शाईहल्ल्यात हर्षवर्धन पाटील जखमी
By Admin | Updated: August 8, 2014 16:03 IST2014-08-08T12:50:54+5:302014-08-08T16:03:37+5:30
धनगर समाजाच्या आंदोलकांनी केलेल्या शाईहल्ल्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

शाईहल्ल्यात हर्षवर्धन पाटील जखमी
>ऑनलाइन टीम
इंदापूर, दि. ८ - सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर भिगवणे येथे धनगर समाजाच्या आंदोलकांनी शाई फेकल्याने पाटील यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असून उपचारांसाठी ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
पाटील यांचा मतदारसंघ असणा-या इंदापूरमधील भिगवण शुक्रवारी ही घटना घडली. धनगर सामाजाच्या आंदोलकांनी पाटील यांच्यावर शाई फेकली. यावेळी काही लोकांमध्ये झटापटही झाल्याने हर्षवर्धन हे जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर इंदापूर व आजबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण असून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
भिगवणे येथे आपण उद्घाटनसमारंभासाठी गेलो होतो कार्यक्रम संपल्यानंतर आपण गाडीत बसण्यासाठी जात असताना चार - पाच तरूण माझ्याजवळ आले व त्यांनी आपल्यावर शाईची अख्खी बाटली उपडी केली, त्यात आपल्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली असल्याचे स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. बारामतीत प्राथमिक उपचार घेऊन आपण पुण्याला रवाना होत असल्याचे ते म्हणाले. तसेच झाला गेला प्रकार आता विसरून जा असे सांगत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे व कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले.